
देशभरात उभारण्यात आलेल्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) च्या वेगवेगळ्या टोलनाक्यांवर बनावट सॉफ्टवेअरद्वारे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगत बुधवारी ईडीने महाराष्ट्रासह देशातील 14 टोलनाक्यांवर धाडी टाकल्या. देशातील जवळपास 200 हून अधिक टोलनाक्यांवर संशयास्पद व्यवहार होत आहेत, असा ईडीला संशय आहे. ईडीने आज टाकलेल्या धाडींमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि जम्मू-कश्मीरमधील टोलनाक्यांचा समावेश आहे. संशयास्पद 200 व्यवहारांपैकी 100 टोलनाके हे एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत, अशी माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ भाजपशासित राज्यात सर्वात मोठा घोटाळा होत असल्याचे समोर आले आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला. हॉस्पिटलचे मार्केटिंग व्यवस्थापक संतोष शर्मा यांच्या हस्ते श्री गणेश सेवा मंडळ – वरळीचा महाराजा मंडळाला गौरवण्यात आले. यावेळी विभागप्रमुख व मंडळाचे विश्वस्त आशिष चेंबूरकर, अध्यक्ष सागर म्हात्रे, दीपक बागवे, हेमंत नाईक, प्रफुल्ल सावंत उपस्थित होते.
राज्य सहकारी बँकेच्या दहिसर शाखेचा 57 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी बँकेचे माजी संचालक यशवंत पाटील, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, शाखेचे पहिले व्यवस्थापक बी. जी. कुरनूरकर, आमदार मनीषा चौधरी, शाखेचे व्यवस्थापक अनिलराज रोकडे उपस्थित होते. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दहिसर शाखेस उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र दिले आहे.



























































