
आंध्र प्रदेशातील पोलावरम जिह्यातील गोल्लागुप्पा गावात मलेरियाविरोधी औषध खाल्ल्यानंतर एका सात वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे औषध खाल्ल्याने 52 लोक आजारी पडले होते. गावात मलेरिया प्रतिबंधासाठी क्लोरोक्वीनच्या गोळ्या वाटण्यात आल्या होत्या. गावात एकूण 71 लोकांना क्लोरोक्वीन औषध देण्यात आले होते.



























































