
दिल्लीत धावत्या स्लीपर बसमध्ये एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना फॉरेन्सिक तपासणीत महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. बसमधून विद्यार्थिनीचे आणि दोन्ही आरोपींचे फिंगरप्रिंट्स मिळाले आहेत. बसच्या सीटवरून आणि स्टिअरिंग व्हीलवरूनही फॉरेन्सिक नमुने घेण्यात आले आहेत. चालक कुलदीप आणि पंडक्टर संदीपचे कपडेही जप्त केले आहेत.



























































