प्रथमेश–मिलिंदची होणार हॅट्ट्रिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्दर्शक मिलिंद कवडे हॅटट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. दोघांचा ‘एक नंबर’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 28 जानेवारीला ‘एक नंबर’ प्रदर्शित होईल.

2019 मध्ये धमाका करणाऱया ‘टकाटक’चे यशस्वी दिग्दर्शन करणाऱया मिलिंद कवडे यांच्या ‘एक नंबर’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘एक नंबर’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. त्याला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे.

याबद्दल मिलिंद कवडे म्हणाले की, पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी फुल टू पैसा वसूल चित्रपट घेऊन आलो आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱया या चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना कुठे ना कुठे तरी पाहिल्यासारखी वाटतील आणि ते ‘एक नंबर’च्या कथानकाशी साधर्म्य साधतील. चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परुळेकर, अभिलाषा पाटील आदी कलाकारांनी काम केले आहे.