एकनाथ शिंदे यांनी केली मेट्रो-3 प्रकल्पाची पाहणी, आरे ते बीकेसीचा पहिला टप्पा डिसेंबर 2021मध्ये

1092

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यावर सर्वप्रथम मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाची पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथील भुयारी मार्गाने प्रवास करत गिरगावातील काळबादेवी मेट्रो स्थानकापर्यंतच्या भुयारी मार्गाची पाहणी केली.

मेट्रो कारशेडच्या जागेला स्थगिती दिल्यामुळे अन्य पर्यायी जागेसंदर्भात काम सुरू असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पात लक्ष घालत असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

मेट्रो-3 प्रकल्पाची वैशिष्टय़े

  • एकूण 33 किमीचा भुयारी मार्ग.
  • एकूण मेट्रो 27 स्थानके
  • एकूण प्रकल्प खर्च 23136 कोटी रुपये.
  • आतापर्यंत 51 टक्के काम पूर्ण.
  • 17 कटर मशीनने भुयाराचे खोदकाम सुरू.
  • भुयाराचे 72 टक्के काम पूर्ण.
  • मेट्रो 3 चा पहिला टप्पा.
  • मेट्रो-3 चा दुसरा टप्पा बीकेसी ते कफ परेड हा मार्ग जून 2022 पर्यंत सुरू होणार.
आपली प्रतिक्रिया द्या