राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा; अदानी, टाटा पॉवरसह महावितरणचे वीज दर घटणार

1767

मुंबईसह राज्यभरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वीज नियामक आयोगाने बहुवार्षिक वीज दर निश्चित केले आहेत. त्यानुसार टाटा पॉवरच्या वीजदरात 19 टक्क्यांची तर आधारित वीज दरात 18 टक्क्यांची घट होणार आहे. तर बेस्टचे दर स्थिर राहणार असून महावितरणच्या दरात किरकोळ कपात होणार आहे. विजेच्या दरात कपात होणार असली तरी पुढील पाच वर्षात घरगुती ग्राहकांच्या मासिक स्थिर आकारात 80 ते 85 रुपयांची वाढ होणार आहे. नवे दर एक एप्रिलपासून लागू होणार आहेत.

राज्यातील विजेचे दर पुढील पाच वर्षांसाठी निश्‍चित करण्यासाठी संबंधित वीज कंपन्यांकडून वीजेवर अनिश्चिततेचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यावर जनसुनावणी झाल्यानंतर वीज नियामक आयोगाने नवे दर आज जाहीर केले आहेत. महावितरणने पुढच्या पाच वर्षात 60 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. आयोगाने आकारात सध्या मिळणाऱ्या महसुलात 22 हजार कोटींची कपात सुचवली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीजदरात पाच टक्क्यांपर्यंत तर औद्योगिक ग्राहकांच्या दरात दहा टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. दरम्यान महावितरणच्या वीज दरात इंधन समायोजन आकार यांचा समावेश नसल्याने ते कपात झाल्याचे दिसत आहे. जेव्हा 50 ते 60 पैसे इंधन समायोजन आकार लागेल तेव्हा दरात वाढ होईल असे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे.

मुंबईतील वीज दर समान करण्याचा प्रयत्न

मुंबईत टाटा, बेस्ट आणि अदानी इलेक्ट्रिसिटी वीज वितरण करते. त्यांचे दर सध्या भिन्न असून ते कमी करण्याच्या दिशेने आयोगाने पाऊल टाकले आहे. बेस्टचे सध्याचे दर टाटा आणि अदानी च्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ते स्थिर ठेवून अदानी आणि टाटाच्या दरात कपात करून वीजदरातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या देशात करोनाच्या संकटामुळे अनेक उद्योग धंदे बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी पुढील तीन महिने औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना स्थिर आकार भरण्यापासून सवलत दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या