मुंबईत आज, उद्या सायरन वाजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील जुने सचिवालय आणि क्रॉस मैदानाजवळील नागरी संरक्षण महाविद्यालयाच्या इमारतींवर बसविण्यात आलेल्या सायरनची 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चाचणी घेण्यात येणार आहे. यादरम्यान सायरन वाजविण्यात येणार आहे. नागरिकांनी या सायरनचा आवाज ऐकून घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महासंचालक (नागरी संरक्षण, नवी दिल्ली) यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटीक्स यांच्या पथकाद्वारे प्रोटोटाइप सायरन उपकरण तयार करण्यात आले आहे.