327 महिने, 1,424 आठवड्यांनी इंग्लंडला विश्वविजयाची सुवर्णसंधी!

62

सामना ऑनलाईन । लंडन

327 महिने… 1,424 आठवडे… 9,969 दिवस… 23, 9, 256 तास… 14, 355,360 मिनिटं आणि 861,321,600 सेकंदांनंतर यजमान इंग्लंड वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. गुरुवारी पाच वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने दारूण पराभव करत इंग्लंडने 1992 नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ देखील वर्ल्डकप इतिहासामध्ये पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये पराभूत झाला आहे. यापूर्वी त्यांनी ज्या-ज्या वेळी सेमी फायनल खेळली आहे त्या-त्या वेळी त्यांनी फायनल गाठली आहे.

1992 ला ग्रॅहम गूच यांच्या नेतृत्वाखाली खेळताना इंग्लंडने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक दिली होती. त्यावेळी त्य़ांच्यासमोर पाकिस्तानचे आव्हान होते. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताने प्रथम फलंदाजी करताना 249 दावा करत इंग्लंडसमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु वसीम अक्रम आणि मुश्ताक अहमद याच्या धारधार गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ ढेपाळला आणि त्यांचा संघ 227 धावांमध्ये ऑलआऊट झाला. यासह इंग्लंडचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंग पावले. त्यानंतर 1996, 1999, 2003, 2007, 2011 आणि 2015 या सहा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडची कामगिरी सुमार राहिली आणि त्यांना एकदाही फायनल गाठता आली नाही.

27 वर्षानंतर आता इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानात खेळताना इंग्लंडने फायनल गाठली आहे. फायनलमध्ये त्यांचा सामना माजी उपविजेत्या न्यूझीलंडशी होणार आहे. लॉर्डसच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. इंग्लंडने हा सामना जिंकल्यास घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकणारा हिंदुस्थाननंतर दुसरा संघ असेल. यापूर्वी हिंदुस्थानने 2011 च्या वर्ल्डकपमध्ये धोनी नेतृत्वाखाली खेळताना अंतिम लढतीत श्रीलंकेचा पराभव करत 1983 नंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला होता.

आपली प्रतिक्रिया द्या