अदनान सामीचं पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य, योग्य वेळ आल्यावर करणार खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध संगीतकार अदनान सामीने पाकिस्ताबाबत ट्विटरवर पोस्ट टाकत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तान प्रशासनाने त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत योग्य वेळ आल्यावर पाकिस्तान सोडण्याचे खरे कारण तो सांगेल. जे ऐकून अनेकांना धक्का बसेल असेही त्याने म्हंटले आहे. त्यामुळे अदनान सामी हे ट्विट चर्चेचा विषय बनले असून ती योग्य नेमकी कधी येईल याची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे.

अदनान सामी 2016 पासून हिंदुस्थानी नागरीक आहे. ब्रिटनमध्ये पाकिस्तानी कुटुंबात या संगीतकाराचा जन्म झाला. अदनान याने ट्विटरवर एक फोटो शेअर करत त्यासोबत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये लिहीलेय की, अनेक लोकं मला विचारतात की, पाकिस्तानबाबत तुझ्या मनात इतका द्वेष का? सत्य असं आहे की, मला पाकिस्तानी लोकांप्रती अजिबात द्वेष नाही. जे खूप चांगले आहेत. मी त्या सगळ्यांवर प्रेम करतो जे माझ्यावर प्रेम करतात. पुढे ते सांगतात त्यांच्यासोबत झालेल्या वर्तनामुळे त्यांना पाकिस्तान प्रशासनाबाबत द्वेष आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ADNAN SAMI (@adnansamiworld)

पुढे त्याने लिहीलेय की, मला पाकिस्तान प्रशासनाचा द्वेष आहे. जी लोकं मला प्रत्यत्क्षात ओळखतात त्यांना हेही माहित असेल त्या प्रशासनाने अनेक वर्षांपासून माझ्यासोबत काय केले. ते माझे पाकिस्तान सोडण्याचे मोठे कारण बनले. पुढे लिहीलेय, एक दिवस मी हे वास्तव जगासमोर आणेन की त्यांनी माझ्यासोबत कसे वर्तन केले. जे अनेकांना माहित नाही, सामान्य लोकांना माहितच नाही. मात्र माझ्यासोबत जे झाले ते ऐकून अनेकांना हादरा बसेल.  मी या सगळ्याबाबत गेली अनेक वर्ष मौन राखलं होतं, मात्र हे सांगण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे.