‘पंचक’ सिनेमाच्या दुसऱ्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत ‘पंचक’ या सिनेमाची प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस असतानाच आता या सिनेमाचा आणखी एक उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील काही नामवंत कलाकारांनी ‘पंचक’च्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे.

नवीन वर्षात प्रदर्शित होणारा हा सिनेमा मल्टीस्टारर आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. तर आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाचे लेखन राहुल आवटे यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

‘पंचक’च्या पहिल्या ट्रेलरने खूप उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता या दुसऱ्या ट्रेलरने अधिक भर टाकली आहे. हा सिनेमा 5 जानेवारी रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.