कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दोन विदेशी कंपन्याही आल्या; 22 डिसेंबरपर्यंत स्वारस्य अभिरुची दाखल करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिका दिल्लीच्या धर्तीवर कृत्रिम पाऊस हा प्रयोग करणार आहे. यासाठी आतापर्यंत चार स्वदेशी कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून आता दोन विदेशी कंपन्यांनीदेखील पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी स्वारस्य अभिररुची दाखल करण्यासाठी 22 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.

मुंबईत काढलेल्या प्रदूषणासाठी प्रकल्पांच्या ठिकाणाहून बाहेर येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालिकेने बांधकाम प्रकल्पांसाठी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. तर हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जात आहेत. यामध्ये दिल्लीच्या धर्तीवर कृत्रीम पाऊस पाडून हवेची गुणवत्ता सुधारली जाणार आहे. यासाठी ‘एक्प्रेस ऑफ इंटरेस्ट’ मागवण्यात आला आहे. याला देशी कंपन्यांसह आता परदेशी कंपन्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.

अशी होणार कार्यवाही

  • हवेत धुळीचे कण, प्रदूषण थांबून राहत असल्यामुळे कृत्रीम पावसाचा प्रयोगही केला जाणार आहे. यासाठी कंपन्यांकडून त्यांचे तंत्रज्ञान समजाकवून घेतले जाणार आहे.
  • यानंतर पात्र ठरणारे तंत्रज्ञान निश्चित झाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्के जाहीर केली जाणार आहेत. यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
  • यामध्ये ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ 100 पर्यंत असल्यास कृत्रीम पाऊस पाडण्याची गरज पडणार नाही. ‘एक्यूआय’ काढल्यास कृत्रीम पाऊस पाडला जाईल.