
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
तुम्ही किती वेळ ऑनलाईन असता याचे उत्तर तुम्ही सहज देऊ शकाल का…? सोशल मिडीयावर तुमचा वेळ किती खर्च होतो, हे सांगणारे फिचर फेसबुकने आणले आहे. ‘युअर टाईम ऑन फेसबुक’ या फिचरद्वारे तुमचा ऑनलाईन राहण्याचा वेळ मोजता येणार आहे.
ऑगस्टमध्ये या फिचरचे ट्रायल घेण्यात आले होते. पण आतापर्यंत हे फिचर फेसबुकने जोडलेले नाही. पण लवकरच ते अपडेट होणार आहे. गेल्या आठवडय़ात इन्स्टाग्रामनेही हे फिचर अपडेट केले होते. फेसबुकवर गेल्यावर सेटिंग्स आणि प्रायव्हसी फिचरमध्ये जाऊन ‘योअर टाईम ऑन फेसबुक’ हे फिचर दिसेल. या फिचरवर जाऊन तुम्ही टाईम लिमीट सेट करू शकता. तसेच तुम्ही रिमाईंटरही सेट करू शकता. या फिचरमधून तुम्हाला गेल्या आठवडय़ातील फेसबुकवर घालवलेला वेळ काढू शकता.
- फेसबुक वापरासाठी ‘वेळमर्यादा’ सेट करता येणार
- वेळ पूर्ण झाल्यावर अलर्टही येणार

























































