तूर्त फॅक्ट चेक युनिटचा नियम नाही, एकल पीठाकडे होणार सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावरील खोटा मजकूर काढून टाकण्याची तरतूद असलेला फॅक्ट चेक युनिटचा नवीन नियम लागू करण्यासाठी मोदी सरकारला अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण हे प्रकरण एक न्यायाधीशाच्या पीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. एकल पीठाकडे सुनावणी होईपर्यंत हा नियम लागू करणार नाही, अशी हमी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात दिली.

हा नियम अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. हा नियम रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका प्रसिद्ध कॉमिडीयन कुणाल कामरा यांनी केली आहे. या याचिकेवर निकाल देताना न्या. गौतम पटेल व न्या. डॉ. नीला गोखले यांनी भिन्न मते नोंदवली. हे प्रकरण एक न्यायाधीशाच्या पीठाकडे वर्ग करण्यात आले. या याचिकेवर अंतिम निकाल येईपर्यंत हा नियम लागू केला जाणार नाही, अशी हमी मेहता यांनी गेल्या वर्षी दिली होती. ही हमी अंतिम निकालापर्यंत कायम ठेवावी, अशी विनंती करणारे तीन अर्ज दाखल झाले आहेत.