प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह

कोलकाताच्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर शरबरी दत्ता याचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आतल्यानंतर खळबळ उडाली आहे. घराच्या बाथरुममध्ये त्या मृतावस्थेत आढळल्या.

शरबरी या कोलकात्यातील ब्रॉड स्ट्रीटवरील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये एकट्याच राहायच्या. गुरुवारी त्या फोन उचलत नसल्याने त्यांचा मुलगा त्यांच्या घरी आला. तर त्यांनी दरवाजाही खोलला नाही. त्यामुळे स्वत:कडील चावीने त्याने दरवाजा खोलला असता त्यांना शरबरी यांचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेला आढळला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी यात घातपात झाला आहे का याचाही तपास करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या