म्हसवडमध्ये झुडपात आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हसवड येथील शिंगणापूर रस्त्यालगत असलेल्या काटेरी झुडपात एक स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. काटेरी झुडपात पोटच्या गोळ्याला बेवारसपणे टाकून देणारी ‘बाळाची माता की वैरीण?’ अशा संतप्त प्रतिक्रिया म्हसवडकरांमधून उमटत आहेत.

म्हसवड येथील शिंगणापूर रस्त्यालगत असलेल्या काटेरी झुडपात दुपारच्या एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांच्या कानी पडला. त्यांपैकी काहीजणांनी आवाजाच्या दिशेने झुडपात जाऊन पाहिले असता, त्या ठिकाणी एक नवजात अर्भक रडत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी त्वरित पथकाला तेथे पाठवून संबंधित बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. संबंधित अर्भकाला लांबूनच कोणीतरी फेकून दिले असून, त्या अर्भकाच्या शरीराला जखमा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.