
फिफा वर्ल्ड कपमध्ये 1990 पासून 2014 पर्यंत जर्मनीने सलामीच्या लढतीत बाजी मारलेली आहे. मात्र, यंदाच्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये जपानने जर्मनीही ही सलामीच्या लढतीतील विजयाची परंपरा खंडित केली. चार वेळच्या जगज्जेत्या जर्मनीला जपानने हरवले यावर अजूनही फुटबॉलप्रेमींचा विश्वास बसत नाहीये, मात्र यंदाचा वर्ल्ड कप जपान जिंकणार अशी भविष्यवाणी आधीच झाली आहे. जपानची राजधानी टोकियोमधील एका मच्छगृहामध्ये असलेल्या उदमांजराने जपान जगज्जेता होणार अशी भविष्यवाणी केली आहे. जपानला जेतेपदाची पसंती देत असलेला उदमांजराचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये जबरदस्त व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये उदमांजर जपानच्या ध्वज लावलेल्या बादलीत फुटबॉलचा चेंडू टाकताना दिसत आहे.





























































