
सामना संपायला सहा मिनिटांचा अवकाश असताना गोंझालो रामोस याने थरारक गोल केला आणि टोरंटो मैदानावर पोर्तुगालच्या संघासह पाठीराख्यांनी तुफान जल्लोष सुरू केला. रामोसच्या गोलमुळे 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न जिवंत ठेवले. पोर्तुगालने क्रोएशियाचा 2-1 असा पराभव करत उपांत्यफेरीमध्ये प्रवेश केला. उपांत्यफेरीमध्ये पोर्तुगालपुढे आता बलाढ्य स्पेनचे आव्हान असणार आहे.
खचाखच भरलेल्या टोरंटो मैदानावर पोर्तुगाल आणि क्रोएशियामध्ये हायव्होल्टेज सामना रंगला. फर्स्ट हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. क्रोएशियाच्या ल्युका मॉड्रिक आणि पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना संघर्ष करावा लागला. त्यामुळे फर्स्ट हाफपर्यंत सामना 0-0 असा बरोबरीत होता. मात्र सेकंड हाफमध्ये क्रोएशियाच्या इव्हान पेरिसिक याने 54 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पोर्तुगालचा संघ बॅकफूटवर गेला.
रोनाल्डेचे विश्वचषचक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा उद्ध्वस्त होते की काय अशी भीती पोर्तुगालच्या चाहत्यांना वाटू लागली. सामना पुढे सरकू लागला आणि प्रत्येक क्षणागणिक धडधड वाढू लागला. मात्र पेनल्टी एरियामध्ये बर्नार्डो वेइगा याला पाडल्यामुळे पोर्तुगालला व्हिडीओ असिस्टंट रेफ्री यांनी पेनल्टी बघाल केली आणि रोनाल्डोने गोल केला. विश्वचषकाच्या बाद फेरीत रोनाल्डोने पहिल्यांदाच गोल करत इतिहास रचला.
A late winner sends Portugal into the Round of 16! 👏#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 3, 2026
सामना 1-1 असा बरोबरीत होता आणि पोर्तुगालच्या प्रशिक्षकांनी 81 व्या मिनिटाला मोठा निर्णय घेत ख्रिस्तियानो रोनाल्डो याला माघारी बोलावले. 90 मिनिटानंतर 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आणि या अतिरिक्त वेळेमध्ये बदली खेळाडू म्हणून आलेल्या गोंझालो रामोस याने हेडरने गोल करत पोर्तुगालला विजय मिळवून दिला. रामोसने गोल केल्यावर रोनाल्डो मैदानात धावत आला आणि त्याने रामोसला कडकडून मिठी मारली.
Goncalo Ramos winning goal in Portugal vs Croatia FIFA World Cup Round of 32 game pic.twitter.com/zuJEEghOHz
— Daily Foot Vibes (@dailyfootvibes) July 3, 2026
आता बाद फेरीत पोर्तुगालचा सामना बलाढ्य स्पेनशी होणार आहे. क्रोएशियाविरुद्ध पोर्तुगालचा मध्यफळीतील ताळमेळ काही काळ बिघडला होता. त्यामुळे स्पेनसारख्या आक्रमक संघाविरुद्ध मैदानात उतरताना रोनाल्डोचा अनुभव आणि रामोसचा फॉर्म यापैकी कुणाला प्राधान्य द्यायचा असा पेच प्रशिक्षक मार्टिनेझ यांच्यापुढे असणार आहे.
दरम्यान, पोर्तुगालचे माजी खेळाडू दिएगो जोटा आणि आंद्रे सिल्वा यांच्या दुःखद निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. सामन्यानंतर रोनाल्डो जोटाची 20 नंबरची जर्सी परिधान करून चाहत्यांचे आभार मानताना कमालीचा भावुक झाला होता. यावेळी रोनाल्डोच्या डोळ्यात अश्रू तरळले.
For Diogo ❤️#FIFAWorldCup pic.twitter.com/v5iwvVp96I
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 3, 2026































































