​दर्गा बांधकाम जमा निधीवरून दोन गटात हाणामारी, ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

सामना प्रतिनिधी, मुक्रमाबाद

पवित्र रमजान ईदच्या दिवशी दर्गा बांधकाम जमा निधीवरून दोन मुस्लिम समाजाच्या गटातील झालेल्या बाचाबाचीवरून तुंबळ हाणामारी झाली. यात अनेकजण जखमी झाले. याप्रकरणी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

१६ जून रोजी पवित्र रमजान ईदच्या दिवशी मुक्रमाबाद येथील मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने एनुल्ला शहवाली दर्गा येथे नमाज अदा करण्यासाठी आले. त्यातील काही मुस्लिम समाज बांधवांनी दर्गा बांधकामाच्या निधीच्या हिशोबावरून बाचाबाचीला सुरुवात झाली. त्याचे रुपांतर वादात होऊन दोन गटात शिविगाळ करत भांडणास सुरुवात झाली. यातील काही मुस्लीम बांधव व पोलिसांच्या मदतीने पुढील भांडण मिटविल्याने अनर्थ टळला होता. पण दुपारी दर्गा बांधकामाच्या निधीवरून दोन मुस्लीम समाज गटातील झालेल्या बाचाबाचीचा व भांडणाचा राग मनात धरून यातील काही आरोपींनी मुक्रमाबाद येथील मुख्य बसस्थानक येथे येऊन परत बाचाबाची केली. या घटनेत फिर्यादी करीमोद्दीन रफीदोद्दीन सय्यद, सय्यद अजीम जलालोद्दीन, शेख सजाद ईलियास, सोहेलखाँ वहाब (सर्व रा. मुक्रमाबाद) यांना आरोपींनी गैररित्या एकत्र येऊन हातात काठ्या, लाठ्या घेऊन फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकास मारहाण करून जखमी केले.

यामुळे रमजान ईदच्या दिवशी शहरामध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांच्या सतर्केने वातावरण शांत झाले. करीमोद्दीन सय्यद यांच्या फिर्यादीवरून अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.