सिंधुदुर्गात स्टॉलला आग, अग्नीशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात जिल्हा रुग्णालयासमोरील स्टॉलला अचानक आग लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मात्र प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरीत तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे इतर स्टॉलचे होणारे नुकसान टळले.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयासमोर अनेक स्टॉल आहेत. या स्टॉलमुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना, अधिकारी, कर्मचारी यांना चहा नाश्त्याची सुविधा मिळते. शनिवारी सकाळी एका स्टॉल धारकाने खाद्यपदार्थ बनविताना उडालेल्या भडक्यामुळे स्टॉलच्या छपराला आग लागली. त्यामुळे स्टॉलधारकांसह उपस्थितांची धावपळ उडाली होती. मात्र प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर उपस्थित असलेल्या कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.