कोल्हापूरच्या इंदिरानगर झोपडपट्टीत अग्नीतांडव

कोल्हापूर येथील शिवाजी पार्क या उच्चभ्रू परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीत आगीची घटना घडली. यामध्ये पाच ते सहा झोपडय़ा भस्मसात झाल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रापंचिक साहित्यासह मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाचे सहा बंब दाखल होऊन, त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले असले, तरी बाजूच्या आठ-दहा झोपडय़ांनाही आगीची झळ बसल्याचे दिसून आले. गॅसगळतीमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

इंदिरानगर झोपडपट्टीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाल्याने, एकच खळबळ उडाली. आग पसरू लागल्याने झोपडपट्टीधारकांनी घरातील प्रापंचिक साहित्य वाचविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे सहा बंब तत्काळ आग विझविण्यासाठी दाखल झाले. तोपर्यंत पाच ते सहा झोपडय़ा भस्मसात झाल्या होत्या.