कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर टायर फुटून कार डोहात बुडाली, पाच महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

गणपतीपुळे येथून देवदर्शन घेतल्यानंतर भाविकांना घेऊन निघालेली तवेरा कार टायर फुटल्याने कोल्हापूर-पन्हाळा मार्गालगत एका डोहात बुडून पाच महिला ठार झाल्या, तर दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघातातील सर्वजण हे सांगलीतील मिरज येथील मालगाव रोडचे रहिवासी आहेत. मृतांत अश्विनी तांदळे (26), त्यांच्या तीन मुली अनिषा, जान्हवी, बेबी आणि धनश्री शशिकांत माने यांचा समावेश आहे. आदर्श तांदळे, ओम तांदळे अशी जखमींची नावे आहेत.

वैभव वसंत वानकर हा चालक अपघातातून बचावला असून त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या कारमधून एकूण 16 जण प्रवास करीत होते. सुदैवाने नऊजण बचावले आहेत.