काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेसचे माजी नेते डॉ. अजित सावंत (60) यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाने आजारी होते. आज मुंबईत त्यांचे निधन झाले.

डॉ. अजित सावंत हे अनेक वर्ष मुंबई काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदांवर होते. मात्र काँग्रेसचा हात सोडत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’मध्ये प्रवेश केला होता. आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांनी आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी संघटना उभारली. त्या संघटनेतून त्यांनी अनेक लढे दिले. कामगारांचे हक्क आणि कामगार कायद्यांबाबत त्यांचा अभ्यास होता.