
सामना ऑनलाईन । रायबरेली
माजी काँग्रेस आमदार व गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केलेले दिनेश प्रताप सिंह हे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आज सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
BJP releases 16th list of 6 candidates in Maharashtra and Uttar Pradesh for #LokSabhaElections2019 . Manoj Kotak to contest from Mumbai North East (where Kirit Somaiya is the sitting MP), Dinesh Lal Yadav ‘Nirhua’ to contest from Azamgarh (UP) against SP’s Akhilesh Yadav. pic.twitter.com/uQvwJpGRSl
— ANI (@ANI) April 3, 2019
दिनेश प्रताप सिंह यांनी 2018 मध्ये काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दोन वेळा काँग्रेसकडून विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आलेले सिंग हे रायबरेलीतीलच रहिवासी आहेत. रायबरेलीतून गेली अनेक वर्ष ते काँग्रेससाठी काम करत होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची चांगली छबी आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी भाजपने सिंग यांच्यासारख्या स्थानिक नेत्याला रायबरेलीतून तिकीट दिले आहे.




























































