संजय निरुपम यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी

काँग्रेसचे माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची अखेर आज काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून पुढील सहा वर्षांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या कारवाईची घोषणा  केली आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत काही विधाने केली होती. त्यांच्या या वक्तव्याची काँग्रेसने गंभीर दखल घेतली. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांची संजय निरुपम यांनी भेट घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव तयार करून काँग्रेस हायकमांडला पाठवण्यात आला होता