
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना दिल्लीच्या न्यायालयाने चार वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे. याचबरोबर हेली रोड, पंचकुला, गुरुग्राम, असोला येथील मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या निकालाने चौटाला यांना मोठा झटका बसला आहे. यापूर्वी 2013 मध्ये शिक्षक भरती घोटाळ्यात ओमप्रकाश चौटाला व त्यांचा मुलगा अजय चौटाला या दोघांना 10 वर्षांची शिक्षा झाली होती. गेल्या वर्षी 2 जुलैला ते तुरुंगाबाहेर आले होते.



























































