बाळासाहेब दांगट यांना जीवनगौरव, आदिवासी भूषण पुरस्कार

जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांना ‘अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली, मुंबई’ या संस्थेच्या वर्ष 2022च्या जीवन गौरव आणि आदिवासी भूषण या राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. अविरत समाजिक कार्याची दखल घेत दांगट यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील अबित खिंड (भोजनेवाडी) येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष रामनाथ भोजने यांच्या मातोश्री दिवंगत बुधाबाई नामदेव भोजने (आदर्श माता) यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे (प्रबोधनकार) यांच्या हस्ते दांगट यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्य स्वीकारून न्यायाची लढाई लढणाऱया तसेच सामाजिक बांधिलकी जपत दुर्बल घटकांचे कल्याण व सर्वांगीण विकासासाठी झटणाऱया आमदार दांगट यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद कार्याध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार होता. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अध्यक्ष रामनाथ भोजने, खजिनदार व आयकर आयुक्त मुंबई वसंत पिचड, संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य डॉ. रवींद्र जाधव, समाजसेवक डॉ. सोमण, संविधान सैनिक कार्याध्यक्ष डॉ. सुरेखा जाधव, महिला अध्यक्ष संगीता भोजने, संगीता साबळे, एसबीआय बँक मॅनेजर मीरा लोहकरे, महासचिव, मुंबई राम चव्हाण, शाहीर भीमराव ठोंगिरे, धोंडीभाऊ पानसरे, शरद ताजने, तानाजी करपे, दिगंबर नवाळे, रामनाथ साबळे, कोतुळ राजेंद्र देशमुख पाटील, भाऊसाहेब जगधने, किशोर रावराणे, प्रकाश वैराळ, सुवर्णा ठाकरे आदी उपस्थित होते.