सिलिंडरच्या स्फोटाने घराची भिंत कोसळली, चार जणांचा मृत्यू तर दोघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील मुलकालेडू गावात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत चार जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींच्या शेजाऱ्यांच्या घरात शनिवारी पहाटे सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र हा स्फोट इतका भयानक होता की घराची संपूर्ण भिंत शेजाऱ्यांच्या अंगावर कोसळली.

ही घटना घडल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.