कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

378

कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवार सकाळी सातच्या सुमारास गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथील गजानन केशवराव खोटे (38) यांच्यावर इंडिया बँक व इतर काही खाजगी बँकेचे कर्ज होते. ते सोमवार पहाटे शेताकडे गेले होते. मात्र उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांना शोधण्यासाठी घरातील नातेवाईक मंडळी शेतात असता त्यांना गजानन खोटे हे लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यची नोंद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या