मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना मुलीनेच धाडले तुरुंगात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्ली येथील गुरुग्राम येथे एका तरुणीवर तिच्या जिवलग मैत्रिणींच्या वडिलांनीच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्या तरुणीच्या मैत्रिणीनेच पीडितेला आधार देत स्वत:च्या वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र आरोपीने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत पीडित मुलगी स्वत: रात्री त्याच्या खोलीत आल्याचा दावा त्याने न्यायालयासमोर केला आहे.

गुरुग्राम येथील लॉ कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्याा या दोन्ही तरुणी लहानपणापासुनच्या जिवलग मैत्रीणी होत्या. एकमेकींच्या घरी जाणे व राहणे त्यांच्यासाठी नवे नव्हते. घटनेच्या दिवशी पीडित तरुणी, तिची मैत्रीण व तिचे वडील तिघे सायबर हब येथे जेवायला गेले होते. यानंतर मैत्रिणीच्या वडिलांनी दारु मागवली व तरुणींना देखील दारू पिण्याचा आग्रह केला. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास तिघे घरी परतले. त्यानंतर पीडित तरुणी एकाच खोलीत झोपल्या होत्या. दरम्यान पहाटे पाचच्या सुमारास मैत्रिणीचे वडील तरुणी झोपलेल्या खोलीत आले व त्यांनी काही कामानिमित्त तरुणीला रुममध्ये बाहेर बोलावले. त्यानंतर त्यांनी तिचे तोंड दाबून जबरदस्ती त्यांच्या खोलीत नेले व तिथे तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकारानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी याबाबत पीडित तरुणीच्या आईला सांगितले व तिघींनी या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.