
प्रेमात धोका देणाऱ्या माजी प्रियकराला प्रेयसीने चांगलीच अद्दल घडवली आहे. माजी प्रियकराच्या घराबाहेर स्वत:चा फोटो असलेले मोठे होर्डिंग लावले आहे. तिने असे का केले ते जाणून घेऊया.
द मिररच्या वृत्तानुसार, इझा रोज असे त्या मुलीचे नाव असून ती अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहते. इझा व्यवसायाने गायिका असून नुकतेच तिचे एक गाणे रिलीज झाले. गाण्याच्या प्रमोशनसाठी शहरभर हौर्डींग्स लावण्यात आले होते. पण त्यांनी स्वत:च्या इच्छेने होर्डिंग लावले. तसेच एक इझाने तिचे एक होर्डिंग तिच्या माजी प्रियकराच्या अपार्टमेंटबाहेर लावले. याबाबत ती म्हणते की, मी ते बसवलंय जेणेकरून माझा होर्डींगवरचा चेहरा पाहून त्याला कायम वाटले पाहिजे त्याने काय गमावले. तसेच माजी प्रियकर आणि त्याची नवीन मैत्रीण मला दररोज होर्डिंगवर पाहतील.
एवढेच नाही तर इझा रोजने या होर्डिंगखाली उभं राहून टिकटॉकवर एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. यात तिने म्हंटलेय बदला घ्यायला चांगला वाटतो. मात्र, तिच्या माजी प्रियकराची प्रतिक्रिया काय होती हे तिला माहीत नाही. गायिका इझा म्हणाली ‘जेव्हा तुमचं हृदय तुटतं त्यावेळी फक्त बदला घ्यायचा असतो आणि दाखवायचं असतं की आपण आनंदात आहोत. मला वाटतं होते ज्या व्यक्तीने माझ्यावर अन्याय केला त्याने माझा चेहरा नेहमी पाहावा आणि मला गमावल्याचा पश्चाताप करावा. मी माझ्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. पुढे इझा म्हणते मला कोणी खाली पाडू शकत नाही. मी पुढे जात राहीन. माझा फसवणूक करणारा प्रियकर आता माझ्याबद्दल काय विचार करतो याची मी पर्वा करत नाही. इतके दिवस मी त्याची काळजी घेतली पण आता तो माझ्या संपर्कात नाही.




























































