मी 15 वर्षाची आहे, मला माफ करा! मोदींबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या मुलीने मागितली माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतरमंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱया मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे माफी मागितली आहे. मी केवळ 15 वर्षांची असून माझ्याकडून काही शब्द चुकीने गेले आहेत. त्यामुळे मला माफ करा, असे या मुलीने एका व्हिडीओद्वारे केले आहे.

आंदोलनादरम्यान मी काही लोकांच्या अपप्रचाराला बळी पडले आणि मी पंतप्रधानांविरोधात अनेक वाईट गोष्टी बोलले. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तिचे वय 25 वर्षे असल्याचे नमूद केले होते, पण आपल्या माफीनाम्याच्या व्हिडीओमध्ये तिने आपले वय अवघे 15 वर्षे असल्याचा दावा केला आहे. माफी मागण्याआधी या मुलीला मोठय़ा प्रमाणात धमक्या मिळाल्या होत्या. तसेच सोशल मीडियावरून तिला ट्रोल करण्यात आले होते.