Google मधील छळवणूक थांबवा, 500 कर्मचाऱयांनी लिहिलं सुंदर पिचाईंना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगल आणि अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांना सुमारे 500 कर्मचाऱयांनी खुले पत्र लिहून कार्यालयात होणाच्या छळवणुकीबाबत तक्रार केली आहे. पत्रातून कंपनीतील छळवणूक थांबवण्याची तसेच शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्याची मागणी कर्मचाऱयांनी केली आहे.

गुगल कंपनीत इंजिनियर म्हणून काम करणाच्या एमी नेटफिल्ड यांनी एका आघाडीच्या दैनिकांत याबाबत लेख लिहिल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. एमी नेटफिल्ड यांनी असा आरोप केला की, त्यांना अशा एका व्यक्तीबरोबर एकापाठोपाठ एक मीटिंग करण्यास भाग पाडलं जायचं, जो त्यांना त्रास देत असे. एमी यांनी आपल्या लेखात म्हटलंय, मला त्रास देणारी ‘ती’ व्यक्ती आतादेखील माझ्या बाजूला बसते.

गुगलच्या कर्मचाऱयांनी सुंदर पिचाई यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, अल्फाबेटच्या 20 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱयांनी छळाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर अद्याप अल्फाबेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ज्या व्यक्तीला त्रास झाला, ती व्यक्ती ऑफिस सोडून जाते. पण दोषी व्यक्ती तिथेच राहतो. एकप्रकारे छळ करणाऱयाला प्रोत्साहन दिले जाते.

कर्मचाऱयांनी असं लिहिलंय की, अल्फाबेटचे कर्मचारी छळवणूक मुक्त वातावरणात काम करू इच्छितात. पीडीत व्यक्तीची काळजी घेण्यास प्राथमिकता देऊन कंपनीने त्यांच्या कर्मचाऱयांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे.