
सामना प्रतिनिधी । लातूर
मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचे स्वागत आहे. मात्र. या मुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या आरक्षणामुळे ओबीसी समाजात सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी असे मत ओबीसी आरक्षण संरक्षण कृती समितीचे सदस्य गोपाळ बुरबुरे यांनी व्यक्त केले आहे. या सह अनेक विषयावर विचार करण्यासाठी सोळा ओबीसी संघटना लातूर येथे एकत्र आल्या आहेत. जनगणनेच्या आधारे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र यात मराठा आणि कुणबी याची एकत्रित संख्या आहे. याबाबतही खुलासा करण्यात आला नाही, असे यावेळी सांगण्यात आले.





























































