मोहोळमध्ये आढळले पुरातन ‘धान्याचे कोठार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मोहोळ येथील बुधवार पेठ येथे घराचे बांधकाम करत असताना भुयार आढळले. त्यानंतर जादा खोदकाम केले असता तेथे पुरातन धान्याचे कोठार (पेव) आढळून आले. हे कोठार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बुधवार पेठेत प्रा. बाजीराव जोशी यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे. हे बांधकाम करताना घराशेजारील भिंतीचे खोदकाम सुरू होते. यावेळी एक मोठा खड्डा आढळला. मोठे भुयार असावे, असे वाटल्याने आजूबाजूची जमीन खोदत असताना 10 बाय 30 रुंद असे दगडाने बांधकाम केलेले सुस्थितीत असलेले धान्याचे कोठार (पेव) आढळून आले. पक्के बांधकाम आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुस्थितीत असलेले धान्याचे कोठार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.