
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलचा पर्दाफाश झाला आहे. गुजरातच्या ग्रामीण भागात पुरवल्या जाणाऱया पिण्याच्या पाण्यापैकी 90 टक्के पाणी अशुद्ध असल्याचे ‘कॅग’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हा अहवाल नुकताच गुजरातच्या विधानसभेत सादर करण्यात आला. गुजरातच्या अमरेली, आणंद, भरूच, दाहोद, गांधीनगर आणि पाटण जिह्यांतील 48 गावांमध्ये तब्बल 78 ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य नाही. सात गावांतील पाण्यात मर्यादेपेक्षा जास्त खनिजे आढळली.

























































