
सामना ऑनलाईन, मुंबई
अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यापासून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया म्हणजेच एफटीआयआयचे अध्यक्षपद रिकामे आहे. या पदासाठी सध्या बऱ्याच नावांची चर्चा सुरू आहे ज्यामध्ये नसरुद्दीन शहा आणि शत्रुघ्न सिन्हा यांचीही नावे आहेत. मात्र या पदासाठी गुलशन ग्रोव्हरची निवड झाल्याची अफवा उठली असून स्वत: गुलशन ग्रोव्हरने या बातम्या खऱ्या आहेत असं एका इंग्रजी वर्तमानपत्राला सांगितलं आहे.
मात्र या कथानकामध्ये एक ट्विस्ट आला असून एफटीआयआयने गुलशन ग्रोव्हरला अध्यक्षपदी नेमण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसून सगळ्या बातम्या निराधार आहेत. FTII चे संचालक भूपेंद्र कंठोला यांनी इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना ही माहिती दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही या सगळ्या बातम्या निव्वळ वावड्या असल्याचं म्हटलं आहे. 18 डिसेंबरला मुंबई मध्ये एफ.टी.आय.आयच्या नव्या अध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुढील अध्यक्ष कोण होतो हे कळू शकेल.





























































