कवठेमहांकाळमध्ये 25 लाखांचा गुटखा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कवठेमहांकाळ पोलिसांनी अवैध व्यवसायांवर मोठी कारवाई केली असून, 25 लाखांच्या अवैध गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सांगली जिह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली असून, कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. 22 दिवसांतील ही त्यांची तिसरी कारवाई आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे अक्षयकुमार हिंगणे, राजेंद्र मानवर, पोलीस नाईक दादासाहेब ठोंबरे, संतोष बोबडे, विनोद चव्हाण यांनी तालुक्यातील शिरढोण येथे मिरजेकडून येणाऱया एका वाहनाची तपासणी करीत असताना, गाडीत लाल मिरचीची पोती आढळली. त्याच्याआड प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची 25 लाखांची पोती आढळली. ही सुंगधित तंबाखू आणि वाहन मिळून 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहनचालक आशीर मुबारक (रा. मिरज) याच्यासह चारजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.