‘हॅण्ड ड्रायर’खाली हात सुकवणे धोक्याचे;जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण अधिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हॉटेल, थिएटरमधील ‘हॅण्ड ड्रायर’खाली हात सुकवणे सर्वाधिक धोक्याचे असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. टॉयलेटमधील हॅण्ड ड्रायरमुळे हात आणि शरीरावर बॅक्टेरिया चिकटण्याची शक्यता जास्त असून तज्ञ डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे.

विमानतळ, फाइव्ह स्टार हॉटेल किंका शहरातील काही टॉयलेटमध्ये हात सुककण्यासाठी हॅण्ड ड्रायरचा कापर केला जातो. ओले हात सुककण्यासाठी हॅण्ड ड्रायरखाली काही सेकंद हात धरले जातात. त्यामुळे हात कोरडे होतात. पण अशा पद्धतीने हात सुककणे आरोग्यासाठी घातक आहे. पुढच्या केळी हॅण्ड ड्रायरचा वापर करताना सावधगिरी बाळगा. ‘अप्लाइड आणि इन्कायर्नमेंटल मायक्रोबायलॉजी जर्नल’मध्ये छापण्यात आलेल्या एका संशोधनानुसार हॅण्ड ड्रायरखाली हात सुकवल्याने आपल्या स्कच्छ हाताकर पुन्हा जंतू किंका बॅक्टेरिया बसण्याची शक्यता असते.

संशोधनातून समोर आलेली माहिती

संशोधकांनी एक प्लेट 30 सेकंद हॅण्ड ड्रायरच्या खाली धरली. या प्लेटकर 18-60 विविध बॅक्टेरिया जमा झालेले दिसले, पण हॅण्ड ड्रायरच्या आतील बाजूस मात्र कमी प्रमाणात बॅक्टेरिया होते. हॅण्ड ड्रायर बंद करून ही प्लेट 2 मिनिटे धरली. या प्लेटकर कमी प्रमाणात बॅक्टेरिया आढळून आले. ही प्लेट पुन्हा बाथरूममध्ये फॅन सुरू ठेवून 20 मिनिटे धरण्यात आली. या प्लेटकर 15 बॅक्टेरिया सापडले.

  • ड्रायरच्या वापरामुळे हवेतील ‘बॅक्टेरिअल पॅथोजिन्स आणि स्पोअर्स’ घरामध्ये शिरू शकतात. ज्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. हॅण्ड ड्रायरच्या कापराने हातावर अधिक बॅक्टेरिया येण्याची शक्यता असते.
  • टॉयलेटमध्ये असणाऱ्या हवेत फ्लोटिंग बॅक्टेरिया असतात. ज्याकेळी आपण हॅण्ड ड्रायरचा वापर करतो त्यावेळी ते बॅक्टेरिया हातावर चिकटण्याची शक्यता असते. या बॅक्टेरियामुळे अनेक आजारही होऊ शकतात, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे कैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायककाड यांनी सांगितले.