
सामना ऑनलाईन । मुंबई
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना हिंदुस्थानी संघातून डच्चू दिल्यानंतर आता खार जिमखान्यानेही हार्दिक पांड्याचे मानद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेत त्याला चांगलाच दणका दिला आहे. यावर खार जिमखान्याचे सहसचिव गौरव कपाडिया म्हणाले, आम्ही राष्ट्रीय खेळाडूंना सदस्यत्व देतो. हार्दिक पांड्याने ‘ते’ वक्तव्य केल्यानंतर क्लबमधील महिलांनी याविरोधात पाऊल उचलायला हवे अशी मागणी केली. अखेर व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत त्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचसह ‘जिलेट’ या कंपनीनेही हार्दिक पांड्यासोबतचा करार मोडीत काढला आहे.




























































