हरिश्चंद्रगडावरील 20 ट्रेकर्सची सुखरुप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. तिथून दीड किलोमीटरवर असणाऱ्या कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे ट्रेकर अडकले होते. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने वाचविण्यात सोमवार (आज) यश आले आहे.

डॉ. अडवाणी यांच्यासोबत 5 महिला व 17 पुरुष ट्रेकिंगसाठी निघाले होते. कोकणकडापासून खाली 800 फूटावर ते अडकून पडले आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नव्हता.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीसांना यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका करण्याबाबत निर्देश दिले होते. अंधार पडल्याने अडकलेल्या 20 ट्रेकर्सना तेथेच रात्र काढावी लागली. पण अत्यंत संयमाने मदतकार्य करण्यात आले. अखेर त्यांना वाचवण्यात यश आले.