जायफळ उगाळून घ्या.. सर्दी खोकला पळवा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या सगळ्यांच्या घरात जायफळ असतेच. गोड पदार्थांना सुगंधी करणारे जायफळ अनेक विकारांवर रामबाण उपाय ठरतो. निद्रानाश, तोंडास येणारी दुर्गंधी, तसेच सर्दी, खोकल्यावरही जायफळ गुणकारी ठरते. लहान मुलांचे बाहेर खेळणे, वावरणे खूप असल्याने वातावरण बदलामुळे सर्दी- खोकला होऊ शकतो. अशावेळी जायफळ उगाळून चाटवल्यास लगेच आराम मिळतो. जायफळ संसर्गजन्य विकारांवर प्रभावी ठरते. सर्दी झाल्यास जायफळ नाकाला आणि कपाळाला लावावे. तसेच खोकला येत असल्यास जायफळ उगाळून दुधात मिसळावे. किंवा तुपात मिसळून त्याचे सेवन करावे. जायफळाचे नियमित सेवन केल्यास अपचन दूर होते. लहान मुलांच्या नाभीवर जायफळ उगाळून लावल्यास पोटदुखी थांबते. जर कान दुखत असेल तर त्यावरही जायफळ उगाळून लावा. त्वरित आराम मिळेल.