
मुंबईत एकच दिवस धुमाकूळ घालून गेलेल्या पावसाने सलग चौथ्या दिवशी ओढ दिल्याने पावसासाठी मुंबईकर वेटिंगवरच आहेत. मात्र मुंबईसह कोकणात पुढील आठवड्यात 2 जुलैपासून धुवाधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने वादळी स्थितीमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आयएमडीच्या इशाऱयानुसार मान्सून सक्रिय होण्यास पुढील तीन ते चार दिवसांची स्थिती अनुकूल आहे.




























































