गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले

56

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आणखी एक दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पणजीत गेल्या 24 तासात 4 इंच व गुरुवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या वेळेत साडेतीन इंच पावसाची नोंद झाली. दक्षिण गोव्यात सांगे व केपे भागात 8 इंचापेक्षाही जास्त विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. मुसळधार पावसाने राज्यातील नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. साखळीतील वाळवंटी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याला गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या