कोकणात पावसाचे थैमान, वाशिष्ठी, जगबुडी, नारिंगी नद्यांनी  धोक्याची पातळी ओलांडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कोकणात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसाने रत्नागिरी जिह्याला तर झोडपून काढले आहे. वाशिष्ठा आणि जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जगबुडीच्या पुलावरील वाहतूक थांबवण्यात आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. खेडमध्येही जनजीवन विस्कळीत झाले असून नदीकाठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिवरे धरणफुटीनंतर आधीच चिपळूणमध्ये भीतीचे वातावरण असताना पावसाच्या रौद्ररूपामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.

शनिवारी सकाळपासून कोसळणार्‍या पावसामुळे चिपळूणमधील वशिष्ठाr नदी दुथडी भरून वाहत आहे. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासूनच वाशिष्ठाrच्या पाण्याची पातळी वाढायला लागली आणि पूरस्थिती निर्माण झाली. शहरातील बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी हा भाग पाण्याखाली गेला आहे. चिपळूण बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे बाजारपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

ठाण्यात एक जण वाहून गेला शोध सुरू

ठाण्याच्या चेकनाका येथील शिवाजी नगर परिसरातील नाल्यात 50 ते 55 वर्षांचा अनोळखी इसम पडून वाहून गेल्याची घटना घडली. पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल त्याचा शोध घेत आहेत.  शिवाजी नगर पालिका शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यात अज्ञात 50 ते 55 वयोगटातील एक इसम पडून वाहून गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाने दिली.