दुष्काळग्रस्तांना मदत आणि धीर देण्याचा शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश – कुंडलिक खांडे

124

सामना प्रतिनिधी । बीड

माझे पक्षप्रमुख कायमच शेतकऱ्यांचा विचार करत असतात. मी वार्षिक पक्षकार्याचा अहवाल त्याच्या हस्ते प्रकाशित करण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पहीला प्रश्न दुष्काळी गावांबाबत केला. शिवसेना म्हणून तुम्ही काय करता. पुढे काय करता येईल यावर सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, दुष्काळग्रस्तांना मदत करा, त्यांना धीर द्या. शेतकऱ्यांबाबत त्यांना असलेला कळवळा आणि काळजी पाहून आम्हालाही अभिमान वाटला, असे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी सांगितले.

वार्षिक पक्षकार्याचा अहवाल पाहत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढील पक्षकार्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांना शुभेच्छा देतानाच पक्ष संघटनवाढ व विस्तार जोमाने करा असे सांगत दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचा आदेश देखील दिले. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पक्षकार्याचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुख खांडेंसह सर्व शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना निवडणुकांसाठी सज्ज रहाण्याबरोबरच माझ्या बळीराजाला विसरू नका. शिवसेनेला भीषण दुष्काळाची जाण असून शिवसेना पावलोपावली शेतकऱ्यांसोबत आहे, हे सिद्ध करून दाखवा, असे यावेळी त्यांनी सांगितल्याचे खांडे यांनी पत्रकारांना सांगितले.

पक्षप्रमुखांच्या भेटीदरम्यान जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांचीही उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या