
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा अद्यापही शेतकर्यांना मिळाला नाही. शेतकर्यांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता पीक विमा तातडीने देण्यात यावा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात शेतकर्यांनी पालकमंत्री तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना काळे झेंडे दाखवले. सेनगाव ते रिसोड रोडवर खैरखेडा फाट्यावरून सत्तारांचा ताफा जात असताना रस्त्यावर उभे राहून शेतकर्यांनी पीक विमा न देणार्या खोके सरकारचा निषेध केला. मिंधे सरकारचा शेतकर्यांविषयी असलेला कळवळा बेगडी असून, त्यांना शेतकर्यांशी काही देणे-घेणे नसल्याचा आरोपही या शेतकर्यांनी केला.
गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयावर 18 जानेवारीपासून शेतकर्यांना पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गोरेगावजवळील भगवती येथील पैनगंगा नदीमध्ये शेतकर्यांनी गुरुवारी जलसमाधी आंदोलन केले. कृषिमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री हिंगोलीत आल्यानंतर गोरेगाव येथील बेमुदत उपोषण करणार्या शेतकर्यांना भेटून त्यांच्या मागण्यासंदर्भाने भेटण्यासाठी त्यांना वेळ नसल्याचे दिसून आले.
View this post on Instagram




























































