महाराष्ट्रभूषण सोहळ्यातील उष्माघाताच्या वृत्तानंतर अमित शहा यांनी ‘ते’ ट्विट उडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दासबोधाचे ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्यात श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला असून त्यातील सात जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

या सोहळ्यानंतर अमित शहा यांनी या कार्यक्रमासाठी झालेल्या अफाट गर्दीचे फोटो शेअर केले होते. मात्र उष्माघातामुळे 10 श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येताच त्यांनी ते ट्विट डिलीट केले. सरकारच्या हलगर्जीपणामुळे लोकांचे मृत्यू झाल्याचा आरोप सध्या होत आहे. त्यामुळे लोकांच्या संतापाचा भडका उडालेला पाहून अमित शहा यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले आहे.