टीम इंडियावर मधमाशांचा हल्ला, सराव करणाऱ्या फलंदाजाला मारला डंख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंड विरोधातील सामन्याआधी टीम इंडियाच्या मागे लागलेली शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीए. हार्दीक पांड्या व सूर्यकुमार यादव जखमी झाल्याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढलेली असतानाच शनिवारी सराव करत असताना टीम इंडियावर मधमाशांनी हल्ला केला. टीम इंडियाचा पहिल्या फळीतील स्टार फलंदाज इशान किशन याला डंख मारला आहे.

रविवारी हिमाचलप्रदेशमधील धर्मशाळा येथे टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. त्या सामन्या आधी टीम इंडिया धर्मशालाच्या मैदानावर नेट प्रॅक्टिस करत होती. त्याच वेळी अचानक मधमांशांनी हल्ला केला. त्यावेळी एक मधमाशीने इशान किशन याला डंख मारला. त्यानंतर इशानला प्रॅक्टिस सोडून जावे लागले.

सूर्यकुमार यादव जखमी

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या जखमी असताना शनिवारी सराव करताना सूर्यकुमार यादवही जखमी झाला. सराव करताना मनगटाला बॉल लागल्याने त्यानेही सराव अर्धवट सोडला.