‘मधाचे गाव’ संकल्पनेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे महाबळेश्वर तालुक्यातील मांघर येथे राबविण्यात आलेल्या ‘मधाचे गाव’ संकल्पनेला राज्य शासनाने ‘सर्वोत्कृष्ट संकल्पना’ म्हणून घोषित करून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळास राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान केला.

‘मधाचे गाव’ ही संकल्पना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात आली असून, ‘देशातील पहिले मधाचे गाव मांघर’ ही संकल्पना राबवून हे गाव मध उद्योगातून स्वयंपूर्ण करणे या उपक्रमाकरिता हा सन्मान करण्यात आला आहे. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, मध संचालनालयाचे दिग्विजय पाटील आदी उपस्थित होते.