
अनेकांना बागकामाची आवड असते त्यामुळे ते घरातील खिडक्यांत तसेच हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावतात. या छोट्य़ा छोट्य़ा रोपट्यांमुळे घराचं सौंदर्य आणखी वाढतं.

वास्तुशास्त्रानुसार देखील घरात झाडं वापरण्याचे काही नियम आहेत. ते काटेकोरपणे पाळणं गरजेचं असतं.

जर चुकीच्या दिशेने तुम्ही झाडं लावली तर तुम्हाला आर्थिक संकंटाचा सामना करावा लागू शकतो. व योग्य दिशा ठेवली तर भरभराट होऊ शकते

घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून जर एखादं काटेदार रोपटं ठेवलं तर घरात आजारी वातावरण राहतं.

घराच्या मुख्य दारासमोर कधीच कोणतंही झाड लावू नका.

गुलाबाव्यतिरिक्त इतर कोणतेही काटेरी झाडं घरातील नकारात्मक उर्जा वाढवतात.

घरात ठेवलेली झाडे ही पश्चिम व दक्षिण दिशेला ठेवू नयेत.

घरात प्लास्टिकची झाडं ठेवू नयेत. त्यामुळे पैसे यायचे रस्ते बंद होतात. तर त्याऐवजी खरी झाडे ठेवावीत त्याने धनलाभाचे रस्ते मोकळे होतात.




























































